मुंबई : युरोपमधील मोलदोवा शहरात चांगल्या पगाराची बल्लवाचारी पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून उत्तराखंडमधील तरुणांची पावणेआठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.उत्तराखंडमधील गडवालचे रहिवासी असलेले मनोहरी बरफु लाल (४८) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना मुंबईत बोलावून फसवणूक करण्यात आली आहे. यावर्षी १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर दरम्यान ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मनोहरी हे बल्लवाचारी म्हणून काम करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परदेशात नोकरीच्या शोधात असताना त्यांची कुणाल सिंह नावाच्या व्यक्तीशी एप्रिल महिन्यात ओळख झाली. त्याने मोलदोवामध्ये बल्लवाचारी पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. बनावट व्हिसा लेटर व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून पाठवून ८ ऑक्टोबर रोजी मनोहरी आणि त्यांच्या मित्रांना मुंबईत बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता ते नरिमन पॉईंट परिसरात आले. तेथे त्यांना ९०० डॉलर्स देण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी संपर्क करणे बंद केले. त्यांनी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.