मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार आशीष शेलार यांचा स्वीय साहाय्यक असल्याचे भासवणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. आरोपीने एका वकिलाला व इतर एका व्यक्तीला दूरध्वनी करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी शेलार यांच्या वैयक्तिक साहाय्यक नवनाथ सातपुते यांनी तक्रार नोंदवल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने एका वकील आणि एका व्यक्तीच्या कुटुंबीयाला दूरध्वनी करून आठ हजार रुपये मागितले होते. आरोपी आमीन इरफान बेंद्रेकर याने एका वकिलालाही दूरध्वनी केला होता. राज्य सरकारकडून कैद्यांना सोडण्याची योजना आहे. त्यात तुमच्या अशिलाचे नाव आहे. तसेच, त्याच्या कुटुंबीयांचे तपशील पडताळणीसाठी आवश्यक आहेत. आरोपीने अशा प्रकारे अनेक वकिलांना दूरध्वनी केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने नालासोपारा येथून आरोपीला अटक केली. आरोपी बेंद्रेकर गुन्हेगारांच्या कुटुंबीयांचे तपशील मिळवायचा.

हेही वाचा >>>Mumbai Rain Update : मुंबईत आज मुसळधारेचा अंदाज

त्यानंतर तुरुंगांमध्ये झालेल्या मारहाणीत किंवा जागेच्या अभावामुळे तो गुन्हेगार जखमी झाल्याचे सांगून त्याच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळायचा, असे वांद्रे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. अशाच प्रकारे, एका गुन्हेगाराच्या कुटुंबीयांकडून आरोपी बेंद्रेकरला आठ हजार रुपये देण्यात आल्याचे एका वकिलाला कळल्यानंतर त्याने ही माहिती शेलार यांचे स्वीय साहाय्यक सातपुते यांना सांगितली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud by pretending to be ashish shelar personal assistant mumbai print news amy