लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या आरोपाखाली जोगेश्वरी पोलिसांनी नुकतीच सलील सांबारी या आरोपीला अटक केली. आरोपीने पोलीस हवालदाराची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार हवालदाराचे वय ५२ वर्षे असून सध्या त्यांची नेमणूक संरक्षण आणि सुरक्षा विभागाात आहे. त्यांची एप्रिल २०२२ मध्ये सलीलसोबत ओळख झाली होती. सलील हा शेअर ट्रेडर असून त्याने अनेकांचे पैसे शेअरमध्ये गुंतविले आहे. त्याने गुंतवणुक केलेल्या पैशांवर अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे त्याने त्याच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. सलीलची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर दर तीन महिन्यांने १० टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने कागदोपत्री करार केला.

आणखी वाचा-मुंबई : स्टेशन मास्तरचा चुकीचा सिग्नल अन् गोरेगावला जाणारी लोकल वाशीला निघाली, पुढे काय झालं?

२६ एप्रिल ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत तक्रारदाराने सलीलकडे तेरा तर त्यांच्या मित्राने पाच लाखांची गुंतवणुक केली होती. ही रक्कम दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना तीन महिन्यांचे तीन लाख रुपये व्याज दिले. मात्र नंतर त्याने त्यांना व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सलील सांबारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून नुकतीच त्याला अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in the name of stock market investment one arrested mumbai print news mrj
Show comments