जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकपदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून नऊ जणांकडून पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील अप्पा कचरू बागूल या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूरचा रहिवासी असलेल्या बागूल याने ठाण्यातील  किशोर बाविस्कर यांच्या भावाला नोकरी लावण्यासाठी तीन लाख रुपये घेतले होते. तसेच इतर आठ जणांकडून २० लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखविले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा