लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : गोव्यात जमिनीमध्ये गुंतणूकीतून कमी कालावधीमध्ये दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आमीष दाखवून जाहिरात दिग्दर्शकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गोव्यातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तक्रारदार सिद्धार्ध जेन्ना हे गोरेगाव येथील रहिवासी असून गेल्या १४ वर्षांपासून जाहिरात दिग्दर्शनाचे काम करतात. त्यांच्या तक्रारीवरून बांगुर नगर पोलिसांनी विक्रमदेव मल्होत्रा, रितू मल्होत्रा, मारिया फर्नांडीस, राल्स्टन पिंटो, लिना मांढरेकर, प्रमोद मांढरेकर, लियो डायस, रश्मी चोडणकर, ज्युडी गोम्स व साईनाथ पाटेकर यांच्याविरोधात फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहेत.
आणखी वाचा-मुंबईत स्त्रियांसाठी पुरेशी शौचालये नाहीत, ४ शौचकुपांमागे केवळ १ शौचकुप महिलांसाठी
तक्रारीनुसार आरोपी विक्रमदेव मल्होत्रा व त्यांची पत्नी रितू मल्होत्रा यांची गोव्यात कंपनी असून त्या कंपनीमार्फत ते जमीनीच्या विक्रीचे काम करतात. तक्रारदार जेन्ना यांना जमीन गुंतवणूकीतून दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी एक कोटी ४९ लाख धनादेशाद्वारे व सव्वा तीन लाख रोखीने मल्होत्रा व त्यांच्या साथीदारांना दिले होते. २०२० मध्ये झालेल्या व्यवहारानंतर तक्रारदार यांच्या नावावर अद्याप जमीन हस्तांतरीत करण्यात आल्या नाहीत. तसेच त्यांची रक्कमही परत देण्यात आली नाही. अखेर याप्रकरणी जेन्ना यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी बांगुर नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.