मुंबई: समाजमाध्यमांवर मैत्री करून एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दीड लाखांची फसवणूक केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घाटकोपरमधील टिळक रोड परिसरात ३० वर्षीय पीडित तरुण राहत असून तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना स्वतःचे मोबाइल नंबर दिले. दोघेही व्हिडीओ कॉलवर बोलायचे. काही दिवसांपूर्वी अचानक या तरुणीने नग्न अवस्थेत तरुणाला फोन केला. त्यानंतर त्याला देखील नग्न होण्यास सांगून त्याचे चित्रीकरण केले.

हेही वाचा – १४ वर्षांपासून घरांची प्रतीक्षा, मुलुंडमधील गृहप्रकल्पाचे केवळ २५ टक्केच काम पूर्ण

हेही वाचा – मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय

काही दिवसानंतर हेच चित्रीकरण तरुणाला पाठवून आरोपी तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तरुणाने पैसे देण्यास नकार देताच तरुणीने त्याला धमकवण्यास सुरुवात केली. नाईलाजास्तव तरुणाने तिला एक लाख ५६ हजार रुपये दिले. मात्र पैशांची मागणी वाढत असल्याने अखेर त्याने याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of one and a half lakhs with youth caught in the trap of love mumbai print news ssb