वाहन खरेदी करण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून त्याद्वारे शताब्दी महिला सहकारी बँकेतून एक कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या दोन जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाडा येथील शताब्दी महिला सहकारी बँकेमधून जॉनसी कोसी आणि मुकुंद मिश्रा या दोघांनी वाहन खरेदीसाठी एक कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी बँकेमध्ये आर. सी. बुक तसेच कर्जासंबंधीची इतर कागदपत्रे सादर केली होती. मात्र, ही कागदपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास येताच बँकेच्या संचालक डॉ. कल्पना हजारे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, नौपाडा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा