लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : सिंगापूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरीचे आमीष दाखवून अभियंत्याची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तक्रारदाराची १० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहाराच्या साहाय्याने पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार सांताक्रुझ येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. त्यांना परदेशात नोकरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे ते संकेतस्थळांवर नोकरीबाबत माहिती घेत होते. ते १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करुन एका खासगी कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ही कंपनी सिंगापूरची असून तेथे नोकरीची संधी असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांना नोंदणीकरण शुल्क आणि कागदपत्रांची पडताळणीसाठी पैसे जमा करावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी सुमारे दहा हजार रुपये हस्तांतरीत केले.

आणखी वाचा-नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

काही दिवसांनी त्याने पुन्हा दूरध्वनी करुन त्यांची नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी झाली असल्याचे सांगितले. त्यांच्या नियुक्तीचे पत्र लवकरच पाठविण्यात येईल. त्यापूर्वी त्याने त्यांच्याकडे वैद्यकीय तपासणी, राहण्याचा परवाना, खाते उघडण्यासाठी, कामाचा परवाना यांसह इतर कामासाठी पैशांची मागणी केली होती. विदेशात नोकरी करण्याची इच्छा असल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात १८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुमारे दहा लाख रुपये हस्तांतरीत केले होते. मात्र ही रक्कम पाठवूनही त्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले अखेर त्यांनी सांताक्रुझ पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. रक्कम हस्तांतरीत झालेल्या बँक खात्याच्या साहाय्याने पोलीस अधिक तपास करत आहेत.