लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून बनावट व्हिसाद्वारे भारतातील बेरोजगार तरूणांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील मुख्य आरोपींना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली. या आरोपींकडून ४८२ पारपत्र हस्तगत करण्यात आले. पतित पबन पुलीन हालदर (३६) व मोहम्मद ईलीयास अब्दुल सत्तार शेख मन्सुरी (४९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. आरोपींनी बनावट कॉलसेंटर चालवून देशभरातील अनेकांची फसवणूक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बॉम्बे इंटरनॅशनल कन्सलटन्सी व इंडियन ओव्हरसीज या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरुणांना अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबीया, कतार व रशिया या परदेशात नोकरीचे आमिष दाखवले. परदेशातील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत नोकरीच्या नावाखाली तरुणाचे पारपत्र मुंबईतील वेगवेगळ्या कार्यालयात जमा करून घेतले. त्यानंतर तरुणांना नामांकित कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर व संबंधित देशांचा बनावट वर्क व्हिझा व्हॉट्स अॅपव्दारे पाठऊन विश्वास संपादन केला. त्यामोबदल्यात तरुणांकडून प्रत्येकी ४० ते ६० हजार रूपये वेगवेगळया बँक खात्यावर स्विकारले. अशाप्रकारे आरोपीनी अनेक तरूणांकडून पैसे उकळले. मात्र त्याला नोकरी दिली नाही शिवाय त्यांचे पासपोर्टही स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केली.

आणखी वाचा-रात्री गारवा, दिवसा उकाडा; मुंबईत किमान तापमान २० अंश सेल्सिअसखाली

आरोपींनी कार्यालय बंद करून पसार होताच तरुणांनी पोलिसांत धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार, एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेने पाच पथके स्थापन करून यापूर्वीच पाच आरोपीना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली होती.

फसवणूक झालेल्या व्यक्तींची एकूण ६२ पारपत्रे, अझरबैझन देशाचे एकूण ७ बनावट व्हिझा, स्टिकर्स व कागदपत्रे, ५ संगणक व संगणकीय साहीत्य – कलर प्रिंटर, ५ टेलिफोन व ७ मोबाइल फोन इंटरनेट कनेक्शन राउटर, विविध कंपन्याचे १४ मोबाइल सीम कार्ड, ३ विविध रबरी शिक्के, विविध बँकांचे १० डेबीट कार्ड, ६ धनादेश पुस्तिका व पासबुक असे गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्यात आले होते.

या कारवाईपाठोपाठ गुन्हे शाखेने या टोळीच्या मुख्य दोन आरोपीना पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. आरोपीकडून फसवणूक झालेल्या तरुणांचे ४८२ मूळ पारपत्र जप्त करण्प्यात आले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात ७ आरोपीना अटक करून एकूण ५४४ पारपत्र हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले. आरोपींनी किमान ५०० च्या वर नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

आणखी वाचा-रिझव्‍‌र्ह बँकेचा राज्यांना इशारा, पण महाराष्ट्राची वित्तीय स्थिती समाधानकारक!

२६ बँक खाती गोठवली

नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींनी वापरलेली २६ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या बँक खात्यांद्वारे आरोपींच्या व्यवहारांची माहिती घेण्याऐ काम सुरू असल्याचे उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रौशन यांनी सांगितले. दोन्ही आरोपी १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.