टाटा मेमोरिअल रुग्णालयातर्फे स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहे. स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. नेहमीच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला नियमित आरोग्य तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे आजार बळावत जातो. आजाराने शेवटचे टोक गाठल्यानंतर वैद्यकीय उपचारही व्यर्थ ठरतात. या अशा निष्काळजीपणामुळे आणि अज्ञानामु़ळे मोठय़ा प्रमाणावर महिला स्तनांच्या कर्करोगाला बळी पडत आहेत.
स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती व्हावी या हेतून टाटा मेमोरिअल रुग्णालयाने महिन्याभराचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना मोफत कर्करोग तपासणी करून देण्यात येणार आहे. या तपासणीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी विभागात ही तपासणी होणार असून त्याच्या नावनोंदणीसाठी ०२२-२४१५४३७९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
‘टाटा’मध्ये महिनाभर मोफत स्तन कर्करोग तपासणी
टाटा मेमोरिअल रुग्णालयातर्फे स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहे. स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे.
First published on: 16-10-2012 at 07:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free breast cancer checking camp