मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील वैद्याकीय मदत कक्षाकडून राज्यातील ४६८ धर्मादाय रुग्णालयांमधील १२ हजारांहून अधिक खाटा निर्धन व गरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्यावर मोफत व सवलतीच्या दराने उपचार होत आहेत. गेल्या पाच महिन्यांमध्ये कर्करोग उपचार, यकृत, मूत्रपिंड, बोनमॅरो प्रत्यारोपण यांसह महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांवर उपचार करून २५८ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. या रुग्णांना १७ कोटी ६९ लाख रुपयांचे उपचार मोफत किंवा सवलतीच्या दराने उपलब्ध झाले.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व गरीब रुग्णांना १० टक्के खाटा रुग्णालयांकडून उपलब्ध करून देण्यात येत नाहीत, अशी तक्रार करणारी याचिका गजानन पुनाळेकर यांनी उच्च न्यायालयात सादर केली होती. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आणि त्यातून पुढे विधी व न्याय विभागाकडून वैद्याकीय मदत कक्षाची स्थापना उपमुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आली. त्याबाबत ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी आदेश जारी करण्यात आले आणि जानेवारीपासून विशेष वैद्याकीय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला. रामेश्वर नाईक हे या कक्षाचे प्रमुख आहेत. निर्धन व गरीब रुग्णांसाठी धर्मादाय रुग्णालयांनी १० टक्के खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक असून फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यादृष्टीने विश्वस्त संस्था कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयकही सादर केले होते आणि ते मंजूर करण्यात आले.

The state government has decided to take out insurance for Asha workers and group promoters in the state of Maharashtra Mumbai news
राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचा काढणार विमा
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Mumbai, mobile clinic, Maharashtra Health Department , luxury vehicles, health department,
तीन कोटींच्या फिरत्या आरोग्य दवाखान्याचा वार्षिक देखभाल खर्च १३८ कोटी! ७६ फिरत्या दवाखान्यांसाठी १० वर्षात लागणार २००० कोटी
A drop in the number of patients due to the protest of doctors protesting the Kolkata incident Mumbai news
डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसंख्येत घट; महानगरपालिका रुग्णालयांतील रुग्णांची संख्या हजाराच्या घरात
Vacancy of Doctor Posts in Health Department Mumbai print news
आरोग्य विभागाची खरेदी उदंड मात्र डॉक्टरांची पदे रिक्त!
Resident doctors protest impacts patient care
Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेला फटका; शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससूनवर वेळ
Assam Hospital Withdraws Adivsory
Unscrupulous People : “वाईट प्रवृत्तीची माणसं आकर्षित होतील असं…”, महिला डॉक्टरांसाठी सूचना; टीका झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने मागे घेतले परिपत्रक!
KEM Hospital, tumor removal, successful surgery, neck tumor, Nikhil Palshetkar, 30 cm tumor, ear-nose-throat department,
केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या गळ्याखालील ३० सेमी गाठ काढली, चार वर्षांच्या त्रासातून रुग्णाची सुटका

हेही वाचा >>> पोलीस डायरी सुस्थितीत ठेवण्यावरून उच्च न्यायालयाची नाराजी, वारंवार आदेश देऊनही दुर्लक्ष केल्याबद्दल खडसावले

या कक्षाने सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून दररोज नियमितपणे १० टक्के खाटांमधील रिक्त खाटा, त्यावर कोणाला दाखल करायचे किंवा केले आहे आदी तपशील ऑनलाइन पद्धतीने वैद्याकीय मदत कक्षाला पाठविणे बंधनकारक केले असून त्यासाठी ऑनलाइन यंत्रणा लवकरच कार्यान्वित होईल. आतापर्यंत या रुग्णालयांकडून कोणतीही माहिती रुग्णांना उपलब्ध होत नव्हती. आता कक्षाकडे ती येईल आणि रिक्त खाटांवर निर्धन व गरजू रुग्णांची सोय करता येईल.

विभागीय कार्यशाळा

विधी व न्याय खात्यामार्फत सुरू असलेली ही योजना व मदतकक्षाबाबत राज्यभरात सर्व संबंधित यंत्रणांना माहिती व्हावी, यासाठी मुंबई, नागपूर, कोल्हापूर आदी ठिकाणी विभागीय कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्यात धर्मादाय रुग्णालयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय महाविद्यालयांमधील व अन्य डॉक्टर आदींचा सहभाग आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात नुकतीच कार्यशाळा झाली. त्यास विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, उपमुख्यमंत्री कार्यालयातील सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

फायदा कुणाला?

● ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ८० हजार रुपये आहे, त्यांना मोफत उपचार. अन्य गरीब रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दराने उपचार.

● मुंबईतील कोकिळाबेन, रिलायन्स, पुण्यातील सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह राज्यातील ४६८ धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व गरीब रुग्णांवर या योजनेनुसार उपचार होऊ शकतील.

● धर्मादाय रुग्णालयांनी १० टक्के खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक. खाटांची संख्या आणखी वाढणार. ● आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड किंवा ओळखपत्र, शिधावाटप पत्रिका किंवा उत्पन्नाचा दाखला, डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन)

कुठे संपर्क करावा?

● उपमुख्यमंत्री कार्यालय विशेष वैद्याकीय मदत कक्ष, मंत्रालय

● संकेतस्थळ : charityhelp.demo@maharashatra.gov.in

● धर्मादाय आयुक्त कार्यालय 

● जिल्हाधिकारी कार्यालय

● शासकीय वैद्याकीय महाविद्यालय 

● धर्मादाय रुग्णालय