मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे. सिकलसेल, एचआयव्हीबाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र एसटी महामंडळाने नुकतेच एक परिपत्रक जारी  करून या रुग्णांना निमआराम आणि आराम बसमधील सवलतीचा प्रवास बंद केला आहे. त्यामुळे भविष्यात या रुग्णांना केवळ साध्या एसटी बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे.

एसटीमधून विविध समाजघटकांना प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. एसटी प्रवासात महिलांना तिकीट दरात ५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीमध्ये दोन्ही गटातील प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच, तोट्यातील एसटीला चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे रुग्णांच्या सवलती कमी करण्यात आल्या आहेत.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?

हेही वाचा >>> मुंबई सेंट्रल-सुरत फ्लाईंग एक्स्प्रेस नव्या रुपात

एसटीच्या वाहतूक विभागाच्या २०१८ सालच्या परिपत्रकानुसार, एसटीतून सिकलसेल, एचआयव्हीबाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली होती. मात्र नुकताच एसटी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकानुसार या रुग्णांना केवळ साध्या एसटी बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमध्ये या रुग्णांना ही सवलत मिळणार नाहीत, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत.