बांधणीला परवानगी; लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर
लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटीचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. परिवहन विभाग व केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेकडून प्रथमच एसटी महामंडळाला मोटार वाहन नियमातून सूट देत बिगर वातानुकूलित बसची नोंदणी व बांधणीची परवानगी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या सुमारे एक हजार बिगर वातानुकूलित स्लीपर बसचा मार्ग मोकळा झाला आहे. स्लीपर बस बांधणीला एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. या बस गाडय़ा रातराणी म्हणून चालवण्यात येणार असून सध्याच्या रातराणीच्या तिकीट किमतीतच ती सेवा देण्याचा विचार महामंडळ करत आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवास, त्यातच रात्रीचा प्रवास बसूनच करावा लागत असल्याने त्रास होतो. काही महिन्यांपूर्वीच ५० शिवशाही वातानुकूलित स्लीपर बस गाडय़ा ताफ्यात दाखल करण्यात आल्या. परंतु याचे तिकीट जास्त आहे. त्यामुळे महामंडळाने स्वस्त व सुखकर प्रवासासाठी बिगर वातानुकूलित स्लीपर बसची बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र देशभर परवाना असलेल्या वातानुकूलित स्लीपर बसची नोंदणी महाराष्ट्रात होते व याच बस गाडय़ाच राज्यात धावतात. बिगर वातानुकूलित स्लीपर बसची नोंदणी राज्यात होत नसल्याने अशा गाडय़ांना धावण्यास परवानगी नाही. महाराष्ट्राबाहेरील बस राज्यात येऊ शकतात. अशी तांत्रिक अडचण एसटी महामंडळासमोर असल्याने स्वत:च्या मालकीच्या बिगर वातानुकूलित बस नोंदणी व बांधणीची अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी परिवहन विभागाची विशेष परवानगी घेणे आवश्यक होते. त्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने पाठवला होता.