लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुलुंड येथील वसंत उद्यान डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला तीन अनोळखी व्यक्तींनी बेदम मारहाण करून लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा-गोरेगावमधील ‘व्यावसायिक’ सोसायट्यांना मान्यता देणाऱ्या निर्णयाला आव्हान!

मुलुंड परिसरात वास्तव्यास असलेले हिरल राबिया (२९) आणि श्लोक इंगळे (२४) ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी वसंत उद्यान डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेले होते. गिर्यारोहणावरून रात्री ८ च्या सुमारास परतत असतांना त्यांना तीन अज्ञात व्यक्ती भेटल्या. या तिघांनी राबिया आणि श्लोक यांना अडवले आणि त्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील मोबाइल, रोख रक्कम आणि बॅग लुटून तिघांनी पोबारा केला. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या मारहाणीत राबिया आणि श्लोक जखमी झाले. डोंगरावरून खाली उतरल्यानंतर त्यांना काही नागरिकांनी तात्काळ मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांनी मुलुंड पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friends who went for climbing were beaten and robbed mumbai print news mrj