लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुंबईत १४ एप्रिलपासून प्रत्येक विभागात महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलाविषयक विविध कल्याणकारी योजनांची माहिती या मेळाव्यांमध्ये देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मेळाव्यांच्या निमित्ताने करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई शहर व उपनगरांमध्ये ‘सरकार आपल्या द्वारी – मातृशक्ती महिला मेळाव्या’चे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या १४ एप्रिलपासून प्रत्येक विभागात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकतीच यासंदर्भात पूर्वतयारी बैठक घेतली होती. प्रत्येक विभाग स्तरावर होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलाविषयक विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या सूचना, तक्रारी ऐकून घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा…. मुंबई : सेंट जॉर्जेस रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांसाठी २५० खाटा राखीव

हेही वाचा…. म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३ : मुदतवाढ आणि नियम बदलानंतर प्रतिसाद वाढला; आतापर्यंत २१ हजार २७९ अर्ज

या मेळाव्यांमध्ये महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. महिला मेळाव्यांच्या समन्वयसाठी प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली आहे.