मुंबई : पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवास आणखी सुकर होणार आहे. बारा डबा लोकलला तीन डबे जोडून पंधरा डबा लोकलच्या येत्या २१ नोव्हेंबरपासून आणखी २६ फेऱ्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. चर्चगेट आणि विरारदरम्यान या लोकल फेऱ्या होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा… …तर एकपडदा चित्रपटगृह बंद करावी, चित्रपटगृहांच्या मालकांचीच मागणी

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : सावरकर वादावरुन काँग्रेस-मनसे संघर्षाची चिन्हं; वाचा राज्यभरातील सविस्तर बातम्या

बारा डब्यांच्या लोकल पंधरा डब्यात रूपांतरित केल्यामुळे प्रत्येक लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. २६ लोकल फेऱ्यांपैकी १० फेऱ्या जलद मार्गावर चालवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. या निर्णयाने पंधरा डब्याच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ होणार आहे. मात्र यामुळे दररोज धावणाऱ्या एकूण फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर पहिली १२ डबा लोकल १९८६ साली धावली आणि त्यानंतर २००६ मध्ये पहिली पंधरा डबा लोकल प्रवाशांच्या सेवेत आली. पश्चिम रेल्वेने अंधेरी – विरारदरम्यान धीम्या मार्गांवर पंधरा डबा लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढविली. त्यानंतर २८ जून २०२१ला या मार्गावर पंधरा डबा लोकलच्या २५ फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आल्या. या नवीन प्रकल्पामुळे पंधरा डबा लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास पश्चिम रेल्वेला बराच फायदा होत आहे. सध्या पंधरा डब्याच्या नऊ लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आहेत.