मुंबई : १ ऑगस्टपासून सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर पावणेपाच मीटरहून अधिक उंच लाटा उसळणार आहेत. तर या पावसाळ्यातील समुद्राला सर्वात मोठी भरती गुरूवारी आणि शुक्रवारी येणार आहे. यादरम्यान पाऊस पडल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेने येत्या पावसाळ्यातील भरती – ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून ऑगस्ट महिन्यात समुद्राला आठ दिवस मोठी भरती येणार आहे. त्यापैकी सहा दिवस पुढील आठवड्यात येणार आहेत. मंगळवार, १ ऑगस्ट ते रविवार ६ ऑगस्ट दरम्यान रोज मोठी भरती येणार आहे.

हेही वाचा… मानसिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी समाज माध्यमाचा आधार; आरोग्य विभाग डॉक्टरांना करणार मार्गदर्शन

हेही वाचा… मुंबईः काँग्रेसच्या मेणबत्ती मोर्चाप्रकरणी गुन्हा दाखल; जमावबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २९ जणांविरूद्ध गुन्हा

चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना पावणेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखलभागात पाणी साचते.

या दिवशी येणार मोठी भरती

दिवस वेळ लाटांची उंची
मंगळवार १ ऑगस्ट सकाळी ११.४६४.५८मीटर
बुधवार २ ऑगस्टदुपारी १२.३०४.७६ मीटर
गुरुवार ३ ऑगस्टदुपारी १.१४४.८७ मीटर
शुक्रवार ४ऑगस्टदुपारी १.५६४.८७ मीटर
शनिवार ५ ऑगस्टदुपारी २.३८४.७६ मीटर
रविवार ६ ऑगस्टदुपारी ३.२०४.५१ मीटर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From today high tide for the next six consecutive days average wave height is more than 4 75 meters mumbai print news asj