बालगृहात हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अखेर मुंबई पोलिसांनी सोमवारी अंत्यविधी केले. गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजी पार्क पोलीस या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेत होते. त्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेशासह विविध ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला होता.
पोलिसांना हसवान निशाद हा मुलगा गिरगाव चौपाटीवर सापडला होता. त्याला ऑगस्टमध्ये माटुंगा येथील बालगृहात ठेवण्यात आले होते. हा मुलगा मानसिकदृष्ट्या अस्थिर असून नीट संवाद साधू शकत नव्हता. चार अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी त्याची बालगृहात हत्या केली होती. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निशाद जिवंत असताना त्याने केवळ तीन शब्दांत पत्ता सांगितला होता. त्यात पारस शाळा, बस्तीपाडा, स्टार चौक या शब्दांचा समावेश होता. त्याच्या पालकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी पोलीस त्या दिशेने काम करत होते. त्यासाठी दिल्ली व उत्तर प्रदेशात पथके गेली होती. पण त्याच्या कुटुंबियांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर सोमवारी शीव येथे निशादवर अंत्यविधी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>Seat Belts compulsory : मुंबईत आजपासून चारचाकी वाहनांमध्ये प्रवाशांनाही सीटबेल्ट सक्ती

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

निशाद डी. बी. मार्ग पोलिसांना ६ ऑगस्ट रोजी गिरगाव चौपाटीवर एकटाच फिरताना सापडला होता. त्याला सरंक्षणाची गरज असल्यामुळे पोलिसांनी त्याला प्रथम बाल कल्याण समिती समोर हजर केले. बाल कल्याण समितीने त्याला बालसुधारगृह दाखल केले होते. बालगृहातील विलगीकरण कक्षात त्याला ठेवण्यात आले होते. निषाद हा कुणाशी काही बोलत नव्हता. बाल सुधारगृहातील अधिकारी त्याच्या आई-वडिलांचा शोध घेत होते. पण एक दिवस रात्री १० वाजण्याच्या सुमारास निषाद हा बेशुद्ध अवस्थेत तेथील कर्मचाऱ्यांना आढळला असता त्यांनी याबाबत डेव्हिड ससून बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यां कळविले.