मुंबई : कांदिवली चारकोप येथील १२ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील फंजीबल चटईक्षेत्रफळ घोटाळा उघड झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) आतापर्यंत मंजूर झालेल्या सर्व प्रस्तावांची छाननी करण्याचे ठरविले आहे. या छाननीत पुनर्वसनातील फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री घटकासाठी वापरल्याचे आढळल्यास संबंधितांना चटईक्षेत्रफळ विकत घेण्यास सांगण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. असा घोटाळा उघड होऊनही संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर काहीही कारवाई करण्याबाबत म्हाडाने मात्र मौन धारण केले आहे. एक प्रकारे म्हाडा या अभियंत्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

चारकोप येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री घटकासाठी वापरले गेल्याची बाब युनायटेड असोसिएशन ॲाफ सोशल एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्टचे रेजी अब्राहम यांनी पहिल्यांदा म्हाडा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे खळबळ माजली. रेजी अब्राहम यांना लिहिलेल्या पत्रात ही चूक आधीच लक्षात आल्याचा दावा म्हाडा अधिकाऱ्याने केला असला तरी तो चुकीचा आहे. आपण तक्रार केल्यानंतरच म्हाडा अधिकारी जागे झाले. आधीच चूक लक्षात आली तर मग अशी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असा सवालही अब्राहम यांनी विचारला आहे.

acb registered case against sra officer shirish yadav
‘झोपुयो’चे तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ‘एसीबी’कडून कारवाई
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
mohan bhagwat
“देश अस्थिर करण्याचा प्रयत्न”, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
Chandrashekhar Bawankule, Candidates, merit,
बावनकुळे म्हणाले, उमेदवारांचा निर्णय जातीच्या आधारावर….
Eknath Shinde, metro project, Eknath Shinde on metro,
चौकशी लावली असती तर मेट्रो प्रकल्प सुरू झाला नसता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप
pm narendra modi rally
पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी; जेसीबीच्या साहाय्याने खडी टाकून…
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती

हेही वाचा… संथ कारभाराचा गिरणी कामगारांना फटका, रांजनोळीतील १२४४ घरांची दुरुस्ती रखडलेली; २५२१ घरांची सोडतही लांबणीवर

याबाबत रेजी अब्राहम यांनी गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग यांच्याकडेही तक्रार केली आहे. गृहनिर्माण विभागाकडून ही तक्रार म्हाडाच्या इमारत परवानगी विभागाकडे पुढील चौकशीसाठी पाठविली जाणार आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी या प्रकरणी सर्वच प्रकरणांची छाननी करण्यास सांगितले आहे. म्हाडाच्या इमारत परवानगी विभागाकडून आतापर्यंत मंजूर झालेल्या सर्वच प्रस्तावांची छाननी सुरु करण्यात आली आहे. या छाननीत असा प्रकार आढळला तर संबंधितांना चटईक्षेत्रफळ विकत घेण्यास सांगण्यात येणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट

म्हाडा अधिकाऱ्यांनी हा घोटाळा गांभीर्याने घेतलेला नाही. असा घोटाळा झाला हे मान्य आहे तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का नाही, ज्या पुनर्विकासात चटईक्षेत्रफळ उपलब्ध नसेल तेथे म्हाडा काय करणार, मजले पाडण्याची कारवाई करणार का, असा सवालही रेजी अब्राहम यांनी केला आहे. म्हाडा पुनर्विकासात रहिवाशांना मोफत फंजीबल व प्रोरेटा (प्रत्येक सदनिकेप्रती लेआऊटमध्ये मिळणारे चटईक्षेत्रफळ) असे ७० टक्के चटईक्षेत्रफळ अतिरिक्त मिळू शकते. रहिवाशांनी आपला हा हक्क सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय आहे घोटाळा?

म्हाडा पुनर्विकासात रहिवाशांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या क्षेत्रफळावर ३५ टक्के फंजीबल चटईक्षेत्रफळ मोफत मिळते. हे फंजीबल चटईक्षेत्रफळ पुनर्वसनासाठी वापरणे बंधनकारक आहे. एका सदनिकेचे फंजीबल चटईक्षेत्रफळ त्याच सदनिकेवर वापरणे बंधनकारक आहे. ते अन्यत्र वापरता येत नाही. अन्यथा ते स्थगित ठेवावे लागते. मात्र हे मोफत फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री करावयाच्या सदनिकांसाठी वापरले गेले. अशा रीतीने हा घोटाळा केला गेला. चारकोपमधील १२ सोसायट्यांच्या पुनर्विकासातील हा घोटाळा समोर आला असला तरी अन्य सोसायट्यांच्या पुनर्विकासातही हा घोटाळा झाला असण्याची शक्यता रेजी अब्राहम यांनी व्यक्त केली आहे.