मुंबई : जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही अभ्यास दौरा या शिष्टमंडळाने केला. मुख्यालयाची भव्यदिव्य व नेत्रदीपक वास्तूरचना पाहून शिष्टमंडळातील सदस्य भारावून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखमी सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने मंगळवारी सांयकाळी पालिका मुख्यालयास भेट दिली. पालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताने सर्व सदस्य भारावून गेले. पालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही अभ्यास दौरा या शिष्टमंडळाने केला. विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मिती संकटांच्या वेळी करावयाचे प्रतिबंध, उपशमन आदींबाबतची महानगरपालिकेची सज्जता पाहून शिष्टमंडळाने कौतुक केले. यावेळी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त आश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार आणि पालिकेतील सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती, बांधकाम, वास्तूरचना, इतिहास आदींबाबत इत्थंभूत माहिती या सदस्यांना देण्यात आली. भव्यदिव्य अशा या वास्तूरचनेचे मूळ रूप जपण्यासाठी पालिकेने आजवर केलेल्या प्रयत्नांचे देखील पाहुण्यांनी कौतुक केले.  

बासरी वादनाचा आनंद

मुख्यालयातील कोर्टयार्ड परिसरात पाहुण्यांसाठी खास बासरीवादन ठेवण्यात आले होते. पंडित भुपेंद्र बेलबन्सी यावेळी बासरीवर यमन राग वाजवत असताना पाहुणे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी या रागाचा आनंद घेतला. त्यानंतर लागलीच पाहुण्यांनी पंडित भुपेंद्र बेलबन्सी यांना राग ‘हंसध्वनी’ वाजवण्याची फर्माईश केली.

मुंबईतील लोकप्रिय पदार्थाचा आस्वाद

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मध्यभागी असलेल्या प्रांगणात  छोटेखानी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील लोकप्रिय रुचकर व्यंजनांचा यावेळी  पाहुण्यांनी आस्वाद घेतला. पाणीपुरी, भेळ, मुंबई चाट, समोसा, वडापाव, पावभाजी, मुंबईचा मसाला चहा इत्यादी व्यंजनांचा यामध्ये समावेश होता. या व्यंजनांचा आस्वाद घेतल्यानंतर प्रतिनिधींनी भारतीय आणि खास मुंबईकर खानपान, खाद्यसंस्कृतीचे विशेष कौतुक केले.