मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने शुक्रवारी लोअर परळमध्ये अतिक्रमण निर्मूलनाची मोठी कारवाई हाती घेतली. गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेडस्, दुकानांसमोरील वाढीव बांधकाम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवले. मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यामुळे पदपथ, रस्ता मोकळा झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोअर परळ पश्चिमेकडील गणपतराव कदम मार्गावर व्यावसायिक दुकानदार, गाळेधारकांनी वाढीव बांधकाम, अनधिकृत शेडस् उभारली होती. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना वाट काढत जावे लागते. या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त प्रशांत सपकाळे आणि जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी दिले होते. त्यानुसार जी दक्षिण विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन, परिरक्षण आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. महानगरपालिकेचे अभियंते, १२ कामगार, दोन मालट्रक आणि पोलीस दलाच्या मदतीने ही निष्कासन कारवाई पार पडली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G south division of bmc undertook major operation to clear encroachments in lower parel on friday mumbai print news sud 02