आगामी निवडणुकीत्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी (३१ ऑगस्ट) विरोधी पक्षांना एकत्र करत तयार झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “ज्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला, रथयात्रा काढणाऱ्या लालकृष्ण अडवाणींना अटक केली त्यांचं उद्धव ठाकरे स्वागत करत आहेत,” असं गजानन किर्तीकर म्हटलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधानपद यावरूनही टीका केली. ते गुरुवारी (३१ ऑगस्ट) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजानन किर्तीकर म्हणाले, “आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात मोदींना विरोध करण्यासाठी देशभरात मोट बांधली गेली आहे. त्याचं नाव ‘इंडिया’ असं ठेवलं आहे. पाटणा व बंगळुरूमध्ये बैठक झाल्यानंतर आज मुंबईत उद्धव ठाकरे या बैठकीची पोस्ट करत आहेत. हे सर्व मिळून २६ पक्ष आहेत आणि त्यातील १७ पक्ष तर घराणेशाही असलेले पक्ष आहेत. त्यांचं उद्धव ठाकरे स्वागत करत आहेत.”

“उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेला काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर करण्याचं काम”

“मेहबुबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, लालू प्रसाद यादव यांचा स्वागत होणाऱ्यांमध्ये समावेश आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या हिंदुत्वासाठी शिवसेना उभी केली, आज त्या शिवसेनेला काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. काँग्रेसने सावरकरांना माफीवीर म्हणत विषारी टीका केली. त्या राहुल गांधींना कोणताही जाब न विचारता आदित्य ठाकरेंनी भारत जोडोत त्यांचं स्वागत करायला, गळाभेट करायला जाणं हा विरोधाभास आहे,” असं मत गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “उद्धव ठाकरे हे आमचे वकील, त्यांनी आमची…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

“राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पायघड्या”

“हिंदुत्ववादाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या, कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना, लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा अडवून त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या वृत्तीच्या लोकांचं हे स्वागत करत आहेत. राहुल गांधी दिशाहीन आणि नेतृत्वहीन नेतृत्व आहे. अशा राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी उद्धव ठाकरे पायघड्या टाकणार आहेत,” अशी टीका किर्तीकरांनी केली.