पालघर येथे स्थापन करण्यात येणारी राष्ट्रीय पोलीस अकादमी गुजरात येथे स्थलांतरित करण्यास खासदार गजानन कीर्तिकर यांनी विरोध दर्शविला आहे. कीर्तिकर यांनी बुधवारी संसदेत गृह विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या वेळेस हा विषय मांडून निषेध व्यक्त केला आणि ही अकादमी पुन्हा पालघर येथेच स्थलांतरित करावी, अशी मागणी केली.
मुंबईवर झालेल्या ‘२६/८’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाच्या केंद्र शासनाने नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि राष्ट्रीय सागरी पोलीस अकादमी पालघर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यांसाठी पालघर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी ३०५ एकर जमीन महाराष्ट्र शासनाने ताब्यातही घेतली होती. आता ही अकादमी गुजरात राज्यातील द्वारका येथील िपडारा गावात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुंबईसाठी पुन्हा धोका निर्माण करणारा तसेच इतर सागरी किनाऱ्यावरील राज्यानाही गुजरात येथील ही अकादमीची जागा गैरसोयीची असल्याचे कीर्तिकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान याबाबतची सद्यपरिस्थिती आपणास माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन याबाबत आपणास कळविण्यात येईल, असे उत्तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी किर्तीकर यांना दिले.      

Story img Loader