मुंबई : गणेशोत्सवात भक्तिभावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपण्यासाठी ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘पर्यावरणीय व वातावरण बदल विभाग’ यांनी संयुक्तरित्या ‘माझी वसुंधरा इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२१’चे आयोजन के ले आहे. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूर या विभागांत घेतली जाईल. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिके  असतील. करोनाचे सावट असल्याने अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही मूर्ती आणून, साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्चय के ला आहे. प्रदूषणामुळे होणारे नुकसान जाणवत असल्याने नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकताही वाढत आहे. प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक वस्तूंवर बंदी असल्याने गणेशभक्तांनी सजावटीचे अनेक कल्पक मार्ग शोधले आहेत. याच कल्पकतेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वर्षभरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे, दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करून जल नियोजन आणि व्यवस्थापन करणे, विजेचा अतिरेक टाळणे, घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून खत तयार करणे, टाकाऊ  वस्तूंचा कमीतकमी वापर आणि हरित जीवनशैली हीच भविष्यातील समृद्ध निसर्गाची नांदी ठरेल.

सहभागासाठी..

स्पर्धेसाठी तीन ते चार रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात २० सप्टेंबपर्यंत पाठवावीत. छायाचित्रे तिन्ही बाजूंनी वेगवेगळी घ्यावीत. त्यात गणेशमूर्ती, मखर, इत्यादी स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. छायाचित्र व माहिती  ’‘२ं३३ं.ीूॠंल्ली२ँं@ॠें्र’.ूे  या ईमेल आयडीवर पाठवावी. उशिरा मिळालेल्या छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक  आणि थर्माकोलचा वापर टाळावा. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क  क्रमांक, ई-मेल आयडी आणि सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी थोडक्यात जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

पारितोषिके

’  ९ हजार ९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक

’  ६ हजार ६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक

’  २००१ रुपयांचे विशेष पारितोषिक

’  विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

’ अधिक माहितीसाठी संपर्क  : लोकसत्ता ब्रँड विभाग, ७वा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई.

’ भ्रमणध्वनी क्रमांक – ९७७३१५४९२४.