दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘श्री गणेश गौरव स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. सुबक गणेशमूर्ती, आरास यांसह स्वच्छता मोहीम व जनहिताचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले कार्य, जैविक कचऱ्याच्या विघटनासाठी केलेले प्रयत्न, पर्यावरण मैत्री आदींचा विचारही या स्पर्धेत करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेतर्फे १९८८ पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘श्री गणेश गौरव स्पर्धे’चे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुबक गणेशमूर्ती, देखावा, त्यासाठी निवडलेला विषयाचा आशय, त्याची मांडणी, मंडळाने केलेले सामाजिक कार्य, परिसरातील स्वच्छता, गणेशोत्सव काळात हाती घेण्यात आलेली स्वच्छता मोहीम, कचऱ्याच्या विघटनास दिलेली चालना, पर्यावरण मैत्रीला दिलेले महत्त्व आदी बाबी पुरस्कारासाठी मंडळांची निवड करताना विचारात घेण्यात येणार आहेत. तज्ज्ञ परीक्षकांच्या निवड समितीने शिफारस केलेल्या विजेत्या मंडळांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा प्रवेश अर्ज व सहभागाची नियमावली पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या गणेशोत्सव पुस्तिका – २०१९मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ही माहिती पुस्तिका पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालिकेची २४ विभाग कार्यालये आणि जनसंपर्क अधिकारी, कक्ष क्रमांक २४, तळमजला, विस्तारित इमारत, पालिका मुख्यालय, महापालिका मार्ग येथे सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते ४.३० या वेळेत उपलब्ध आहेत.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी असणे गरजेचे आहे. तसेच पालिका, वीज कंपन्या, पोलीस खाते यांचे परवाने प्राप्त असलेल्या मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh gaurav competition for ganesh festival abn