मुंबईमध्ये तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सतर्क राहावे. शॉर्टसर्किट अथवा अन्य आपत्कालीन परिस्थती निर्माण झाल्यास मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे.

हेही वाचा >>> मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

करोना संसर्गामुळे लागू कडक निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गेली दोन वर्षे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. यंदा करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. पुढील तीन दिवस मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> गृहयोजनांत पोलिसांना २५ टक्के आरक्षण; म्हाडा, सिडको, ‘झोपु’ मध्ये समावेशाची शक्यता 

मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंडपाचे नुकसान होण्याची, तसेच शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडपस्थळी पावसाचे पाणी साचून दुर्घटना घडू शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्या. आवश्यकता भासल्यास मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी मदत क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा. तसेच आपापल्या विभागातील समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.

Story img Loader