नवी मुंबई मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिवली महानगरपालिकेची स्थिती सुधारा मग नवी मुंबईबद्दल बोला, असे आव्हान माजी मंत्री गणेश नाईक यांनी रविवारी नेरुळ व कोपखरणे येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.
येत्या २३ एप्रिल रोजी निकाल लागल्यांनतर कोण कोणाला गाडते ते बघू असे आव्हान ठाकरे यांना दिले. सरकार युतीचे असले तरी दादागिरी सहन करुन घेणार नाही जशास तसे उत्तर देवू. असे नाईक म्हणाले. तर आमदार नरेंद्र पाटील म्हणाले की, हे सरकार कामगार चळवळ दडपणारे असल्याने या सरकारचा धिक्कार करतो, सरकारला कामगार चळवळ माहीत नाही. मात्र माथाडी कामगार वर्गाची दखल शिवसेनेला घ्यावी लागली हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे अशी पुस्ती नरेंद्र पाटील यांनी जोडली.

Story img Loader