कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश साळवी यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे सादर केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक असलेल्या साळवी यांना गळाला लावत शिवसेनेने आव्हाड यांना मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड झाले आहे.
गणेश साळवी हे स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे आघाडीची सदस्यसंख्या कमी झाली असून शिवसेना पुरस्कृत उमेदवार विलास कांबळे यांची विजयी दिशेने वाटचाल मानली जाते. समाजवादी पार्टी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता परत शिवसेना असा प्रवास करणाऱ्या गणेश साळवी यांच्या राजीनाम्यामुळे कळव्यात पोटनिवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत साळवी यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना पुन्हा गळाला लावत शिवसेनेने आव्हाडांचे हिशेब चुकते केले आहेत.
गणेश साळवी यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा
कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश साळवी यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे सादर केला.
First published on: 11-10-2013 at 12:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh salvi to resign from councilors post