आरोग्य, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानंतर ‘शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’नेही करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव रद्द केला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने गणेशोत्सव करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद येत आहे. बहुतांशी मंडळे मूर्ती, देखावे यात बदल करून उत्सवाचे रूप शक्य तितके साधे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु उत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी आरोग्य, रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत.
त्यानंतर आता शिवाजी पार्क येथील केळुस्कर मार्गावरील ‘शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने’ही सामाजिक जबाबदारीचे भान राखत यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील ४८ वर्षांपासून हे मंडळ कार्यरत आहे. मंडळाचे वैशिष्टय़ असलेला देखावा व रोषणाई पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. यंदा गणेश भक्तांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाचे सरचिटणीस रमणी चंद्रन यांनी सांगितले.
सरकारी नियमाप्रमाणे गणेशोत्सव
माटुंगा किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाच्या गणेशोत्सवाला दरवर्षी विशेष गर्दी असते. गेली ६५ वर्षे ही मूर्ती मंडपातच साकारली जाते. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे गर्दी करत असतात. सार्वजनिक मंडळांवर चार फूट मूर्तीचे बंधन घालण्यात आल्याने मूर्तीला दागिने घालता येणार नाहीत. परिणामी यंदाही मंडळाच्या १४ फुटी पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीला परवानगी द्यावी, अशी विनंती मंडळाने राज्य सरकारकडे केली होती. तसेच मूर्तीचे विसर्जनही मंडपातच केले जाईल याची ग्वाही मंडळाने दिली होती. परंतु गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहिला असून अद्याप सरकारकडून कोणतीही परवानगी आलेली नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत साधेपणाने करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असल्याचे मंडळाचे आर. जी. भट यांनी सांगितले. यंदाची मूर्ती कशी असेल, किती फुटाची असेल याबाबत मात्र अद्याप स्पष्टता आलेली नाही.