वाहन भाडय़ाने घ्यायचे आणि रस्त्यात त्या वाहनचालकाची हत्या करून वाहन लुटणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अशापद्धतीने हत्या केल्याचे एक प्रकरण समोर आले असून त्यांनी अशाप्रकारचे आणखी गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा १० च्या पथकाने जोगेश्वरीला एका व्यापाऱ्याला लुटायला आलेल्या तीन तरुणांना अटक केली. अनिल तिवारी (२१) धीरज गुप्ता (३०) आणि मोहम्मद अहमद खान (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली. ३ जूनला या टोळीने शिर्डीला जाण्यासाठी एक स्कॉर्पिओ भाडय़ाने घेतली होती. नालासोपाऱ्यातील आशुतोष पाठक ऊर्फ बंटी नाावाच्या इसमाची ही स्कॉर्पिओ गाडी होती. नाशिक जिल्’ाातील कळवण तालुक्याच्या हद्दीत या तिघांनी आपल्या चौथ्या साथीदारासह पाठक याची हत्या केली. त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याचा मृतदेह महामार्गाजवळ फेकून दिला होता. यानंतर स्कॉर्पिओ गाडी उत्तरप्रदेशात नेऊन विकून टाकली होती. पाठक बेपत्ता असल्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या तिघांच्या अटकेनंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या तिघांना म्होरक्या विनय पाठक असून तो सध्या फरार आहे. या टोळीने अशा पद्धतीने अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. विशेष म्हणजे या आरोपींची कोणतीही गुन्हेगारी नोंद नाही. गुन्हे शाखा १० च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपिका जहागिरदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रऊफ शेख माने आदींच्या पथकाने या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा