लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : अल्पवयीन मुलींच्या मदतीने कार्यालय आणि घरात घुसून चोरी करणाऱ्या गुजरातमधील महिलांचा टोळीला माटुंगा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलींनाही ताब्यात घेतले असून या सर्व महिला सुरत येथील राहणाऱ्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दादर आणि माटुंगा परिसरात काही महिला आणि अल्पवयीन मुली घरात आणि कार्यालयात घुसून मोबाइल, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करीत असल्याची माहिती माटुंगा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे माटुंगा पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून या टोळीचा शोध सुरू केला होता. पोलीस गस्त घालत असताना गुरुवारी रस्त्यावरून काही महिला संसायस्पद फिरताना आढळल्या. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आणखी वाचा-मुंबई: मध्य रेल्वेवर शनिवारी, तर हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेखा राठोड (३५), निली पवार (३०) आणि मनीषा पवार (२०) अशी या महिलांची नावे असून तिघीही सुरत येथील रहिवासी आहेत. या महिलांनी तीन अल्पवयीन मुलींच्या मदतीने, माटुंगा, दादर, कुर्ला नेहरू नगर परिसरातील अनेक घरांमध्ये चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाइल आणि काही रोख रक्कम हस्तगत केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang of women from gujarat who steal from houses and offices in mumbai is arrested mumbai print news mrj