किराणा दुकानात सामान खरेदी करून घरी येत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी रात्री उल्हासनगरमध्ये घडली. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या या तीनही तरुणांना अटक केली आहे. या तरुणांच्या मारहाणीत ही महिला जखमी झाली असून, तिच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पतीपासून विभक्त झालेली ही तरुणी उल्हासनगर कॅम्प क्रमांक-तीनमध्ये आपल्या आईसोबत राहते. शुक्रवारी रात्री ती किराणा सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. तेथून परतत असताना तिच्या घराजवळील चिंचोळय़ा गल्लीतून जात असताना पाठीमागून आलेल्या एका तरुणाने तिचे तोंड दाबले आणि त्यानंतर त्याच्यासह अन्य दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. या तरुणीने आरडा-ओरडा करताच ते तिघेही तरुण पळून गेले. घरी परतल्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. हे तरुण याच भागातील राहत असल्याने या तरुणीला त्यांची तोंडओळख होती. त्या मदतीने पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या विजय खरात (२३), दत्ता कांबळे (२०) आणि सुनील प्रधान (२५) या तरुणांना अटक केली.उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री एका विवाहित महिलेवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. न्यायालयाने त्यांना १३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
उल्हासनगरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
किराणा दुकानात सामान खरेदी करून घरी येत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी रात्री उल्हासनगरमध्ये घडली
First published on: 11-05-2014 at 01:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang rape case in ulhasnagar