कुख्यात गॅंगस्टर कुमार पिल्लई याला सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी सिंगापूरहून मुंबईत आणले. पिल्लईविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यार्पणाचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यावर सिंगापूर पोलिसांनी सोमवारी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजता पिल्लईला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले. इंटरपोलने पिल्लईविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये त्याला सिंगापूरमध्ये पकडण्यात आले होते. पिल्लईवर मुंबईत खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न असे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते. १९९० पासून तो देशाबाहेरच होता. त्यापूर्वी त्याला एकदा पोलिसांनी पकडले होते. पण जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्याने देशातून पलायन केले होते.

Suspect related to Babbar Khalsa arrested from Mumbai NIA takes action
बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
police arrested accused who looted citizens with fear of Knife
चाकूचा धाक दाखवून पादचाऱ्यांची लूटमार
Bollywood Actor Shakti Kapoor.
Shakti Kapoor : शक्ती कपूर यांच्या अपहरणाचा कट फसला; वाँटेडमधील अभिनेत्याची सुटका, पोलिसांची धक्कादायक माहिती
ram gopal varma on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर राम गोपाल वर्मा यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तेलंगणा सरकारने मुद्दाम…”
Telangana CM Revanth Reddy on Allu Arjun arrest
Revanth Reddy on Allu Arjun arrest: “अल्लू अर्जुन सीमेवर युद्ध लढत नाहीये, पैसे कमवतोय”, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फायर मोडमध्ये; अटकेचं केलं समर्थन
Husband Of Woman Killed In Stampede
Allu Arjun arrest big update: अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणी मोठी घडामोड; मृत महिलेच्या पतीनं तक्रार मागे घेण्याची दर्शविली तयारी
Allu Arjun sent to 14 day custody
मोठी बातमी! अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, अभिनेत्याची तेलंगणा हायकोर्टात धाव
Story img Loader