कुख्यात गॅंगस्टर कुमार पिल्लई याला सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी सिंगापूरहून मुंबईत आणले. पिल्लईविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यार्पणाचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यावर सिंगापूर पोलिसांनी सोमवारी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजता पिल्लईला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले. इंटरपोलने पिल्लईविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये त्याला सिंगापूरमध्ये पकडण्यात आले होते. पिल्लईवर मुंबईत खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न असे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते. १९९० पासून तो देशाबाहेरच होता. त्यापूर्वी त्याला एकदा पोलिसांनी पकडले होते. पण जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्याने देशातून पलायन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा