लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : हद्दपारीचा आदेश धुडकावून परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका महिलेला नेहरू नगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या महिलेच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले होते. कुर्ला परिसरातून हद्दपार करण्यात आलेली महिला लता निकम (४०) गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या दृष्टीस पडली. चेंबूरच्या वच्छलाताई नगर परिसरात सोमवारी पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना लाता संशयास्पदरित्या फिरताना दिसली. पोलिसांनी तात्काळ तिला थांबण्याची सूचना केली. मात्र ती पळून जाऊ लागली. पोलिसांनी पाठलाग करून तिला ताब्यात घेतले.

आणखी वाचा-मलबार हिलमध्ये टॉवेलने गळा आवळून पत्नीची हत्या; आरोपीला अटक

पोलिसांनी तिच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात १८२ ग्राम गांजा सापला. हद्दपारीचा आदेश धुडकवणे आणि गांजा तस्करीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली.