मुंबई – मुलुंड मधील प्रसिध्द गणेश मूर्तीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे. पाच फूट रुंद आणि सहा फूट लांब अशी ही रांगोळी असून १४ सप्टेंबरपासून ती नागरिकांना पाहता येणार आहे.दोडेचा यांनी १९६१ पासून आशा प्रकारच्या रांगोळ्या तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी तयार केलेली रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या सागो रांगोळीची आंतरराष्ट्रीय गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. यावर्षी देखील त्यांनी पाच फूट रुंद आणि सहा फुट लांब अशी ही रांगोळी तयार केली असून ३५ किलो साबुदाणे वापरले आहेत.महिन्याभरापूर्वी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या रांगोळीला सुरुवात केली असून रोज १२ ते १५ तास ते या रंगोळीवर काम करत आहेत. सध्या या रांगोळीचे काम अंतिम टप्यात आहे. १४ सप्टेंबर २०२४ पासून २२ सप्टेंबर २०२४ पर्यंत ही रांगोळी मुलुंडच्या आझाद भवन येथे पाहता येणार आहे.