देवनार आणि मुलुंड क्षेपण भूमीवर कचरा वेचणाऱ्या २३०० महिलांना तेथील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंत्राटदाराने कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नोकरी देण्याची अट महापालिकेकडून घालण्यात आली असून त्याचे पालन होण्यासाठी सरकार प्रयत्न करील, असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेत केले.
या महिला गटांचेच फेडरेशन करून त्यांना कचरा प्रक्रिया करण्याचे काम द्यावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी सभागृहात केली. पण कचरा वेचणाऱ्या महिलांचे काम कंत्राटदाराला देण्यात आलेले नसून त्यांच्या बचत गटांना महापलिकेने टेम्पोही दिला आहे. कचरा प्रक्रिया करण्याचे काम कंत्राटदाराला २५ वर्षांसाठी देण्यात आले आहे. या महिलांना मानवतावादी भूमिकेतून योग्य सुविधा दिल्या जात नसल्यास त्याबाबत महापलिकेला समज दिली जाईल आणि त्याची पूर्तता केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा