कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शिवडी येथील महानगरपालिकेच्या चाळींच्या परिसरात ओल्या कचऱ्यापासून मिथेन वायूनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ३०० किलो ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस पद्धतीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून दिवसाला १० किलो वायू निर्मिती होऊ शकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई महानगरपालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपुष्टात येत आहे. त्यामुळे महानगरपालिका कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले.

हेही वाचा >>> मुंबई : सुशोभित केलेले पदपथ फेरीवाल्याना आंदण; अंधेरीत फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले

२० हजार चौ. मी.पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावरील गृहसंकुल, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या सोसायट्या वा उपहारगृहे इत्यादींनी त्यांच्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करवे, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करावी असेही नियम करण्यात आले आहेत. तसेच विभागातील कचरा विभागातच विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कचऱ्यापासून उर्जा निर्मितीचे लहान लहान प्रकल्प उभे केले आहेत. हाजीअली येथे असाच एक प्रकल्प नुकताच उभारण्यात आला होता. आता शिवडी येथे इस्टेट प्रॉपर्टी परिसरात कचऱ्यापासून वायू निर्मिती करणारा एक प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. त्याकरीता महानगरपालिकेने निविदाही मागवल्या आहेत. या परिसरात महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या चाळी असून तेथे दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होत आहे.

हेही वाचा >>> मुंबई: पश्चिम रेल्वेच्या आठ विशेष लोकल फेऱ्या; ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सुविधा

परिसरात निर्माण होणाऱ्या ३०० किलो कचऱ्यापासून वायू निर्मित करून त्याआधारे विद्युत जनित्राद्वारे विभागातील रस्त्यावरचे दिवे उजळता येतील, असा हा प्रकल्प आहे. यामुळे विजेसाठी होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. तसेच सुमारे ५०० किलो कचऱ्याच्या वाहतुकीवरील खर्चही वाचणार आहे.