लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: चेंबूरच्या वाशीनाका परिसरात बुधवारी रात्री स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे घरात आग लागली. या आगीत एक वृद्ध व्यक्ती गंभीरित्या जखमी झाली असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Deputy Commissioner Bhagyashree Navtake refusal to investigate multi-state credit union scam
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीला उपायुक्त नवटके यांच्याकडून सुरुवातीला नकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Bogus woman doctor arrested in Gowandi
गोवंडीत बोगस महिला डॉक्टरला अटक
ED raids Maharashtra, maharashtra assembly election 2024
निवडणूक गैरप्रकारासाठी १२५ कोटी रुपयांचा वापर, ‘ईडी’ने महाराष्ट्रातील २४ ठिकाणी छापे टाकले
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…

चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक ६ मध्ये बुधवारी रात्री ११ च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागली. नाफिर सय्यद (६०) यांच्या घरात ही आग लागली. आगीमुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले स्थानिक रहिवाशांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि आरसीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवले.

आणखी वाचा-बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीला उपायुक्त नवटके यांच्याकडून सुरुवातीला नकार

या घरात अडकलेल्या नाफिर सय्यद यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि शीव रुग्णालयात दाखल केले. निफिर सय्यद ३० टक्के भाजले आहेत. वाशीनाका परिसर दाटीवाटीचा भाग आहे. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.