मानखुर्द येथे सोमवारी पहाटे गॅस टँकरमधून गळती होऊन झालेल्या अपघातातील टँकर ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’चा नसून ‘भारत पेट्रोलियम’चा होता, असा खुलासा हिंदुस्तान पेट्रोलियमतर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून तो अपघातग्रस्त टँकरचा चालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टँकरचालकाचे नाव विजयकुमार पांडे असे असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, उर्वरित जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा जखमींना घरी पाठविण्यात आले आहे.
मानखुर्द अपघातातील टँकर भारत पेट्रोलियमचा
मानखुर्द येथे सोमवारी पहाटे गॅस टँकरमधून गळती होऊन झालेल्या अपघातातील टँकर ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’चा नसून ‘भारत पेट्रोलियम’चा होता, असा खुलासा हिंदुस्तान पेट्रोलियमतर्फे करण्यात आला आहे.
First published on: 06-03-2013 at 03:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas leak tanker belong to bharat petroleum