Gateway Of India Boat Accident : मुंबईतल्या एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून आतापर्यंत या बोटीवरील २१ जणांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू ( Gateway Of India Boat Accident ) झाला. दरम्यान, या बोटीवर ३० ते ३५ प्रवासी होते. त्यांना वाचवण्यासाठी नौदल व मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आलं.

नीलकमल नावाची बोट बुडाली

एलिफंटा येथे जाणारी ‘नीलकमल’ नावाची फेरीबोट बुडाल्याची ( Gateway Of India Boat Accident ) प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याचे समजते. नौदल, जेएनपीटी आणि तटरक्षक दल तसंच यलोगेट पोलीस ठाण्यातील आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात आलं. आपण जाणून घेऊया नीलकमल बोटीचा हा अपघात नेमका कसा घडला?

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात

प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?

अपघातानंतर ( Gateway Of India Boat Accident ) प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आलं. त्यापैकी एका प्रवाशाने सांगितलं, आमची बोट पाच ते सात किमी समुद्रात होती. त्यावेळी मी बोटीच्या डेकवर उभा होतो. एक स्पीड बोट आमच्या आजूबाजूला फिरत होती. ही स्पीड बोट आम्हाला धडकू शकते अशी भीती मला वाटली. नेमकं घडलंही तसंच. ही स्पीडबोट भरधाव वेगाने आली आणि आमच्या बोटीला जोरात धडकली. त्यावेळी स्पीडबोटमधल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा पाय कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेतल्या त्या जखमी प्रवाशाला आमच्या बोटीत घेण्यात आलं. स्पीडबोटची धडक जोरात बसल्याने आमच्या बोटीत पाणी शिरु लागलं आणि बोट बुडू लागली अशी माहिती या प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली आहे. एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना ही माहिती त्याने दिली.

नीलकमल बोट जवळपास सुमारे सात किमी समुद्रात गेल्यानंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटने आमच्या बोटीला धडक ( Gateway Of India Boat Accident ) दिली. ‘नीलकमल’ या बोटीत पाणी भरु लागलं. त्यानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट्स घालण्यास सांगितलं गेलं. पण तोपर्यंत बोट पाण्यात बुडाली होती. मी जवळपास १५ मिनिटं पाण्यामध्ये पोहत होतो. धडक दिलेल्या स्पीड बोटीमध्ये ८ ते १० लोक होते. असंही या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात ( Gateway Of India Boat Accident ) झाला आहे. यामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना वाचवलं आहे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येतील. तर मृतांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून मदत दिली जाईल.”

Story img Loader