महापालिकेने दादरमधील गौतम नगरातील सफाई कामगारांच्या वसाहतीमधील काही इमारतींची खासगी संस्थेमार्फत संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून या इमारती १० दिवसांसाठी रिकाम्या करण्यात आल्या आहेत. संरचनात्मक तपासणी पूर्ण झाल्यानंतर या इमारतींचा पुनर्विकास अथवा दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
गौतम नगरमधील कामगारांच्या इमारती धोकादायक बनल्यामुळे पालिकेने त्यांची संरचनात्मक तपासणी केली होती. त्यानंतर सुरुवातीला काही इमारती आणि नंतर संपूर्ण वसाहत रिकामी करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. त्यामुळे वसाहतीमधील एका इमारतीतील ४४ रहिवाशांनी स्थलांतर केले. मात्र अन्य इमारतींमधील रहिवाशी घर रिकामे करीत नसल्याने प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची नोटीस बजावली होती. या कामगारांनी पालिकेच्या संरचनात्मक तपासणीला विरोध दर्शविला आहे. तसेच बुधवारी अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांची भेट घेऊन कामगारांनी पुन्हा संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी केली. आता खासगी संस्थेमार्फत संरचनात्मक तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर या इमारतींचा पुनर्विकास अथवा दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
गौतम नगरमधील पालिका वसाहत १० दिवसांसाठी रिकामी
महापालिकेने दादरमधील गौतम नगरातील सफाई कामगारांच्या वसाहतीमधील काही इमारतींची खासगी संस्थेमार्फत संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून या इमारती १० दिवसांसाठी रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
First published on: 12-10-2013 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam nagar municipal colony empty for 10 days