प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील काही ना काही कारणाने चर्चेत असते. सध्या ती राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय तिच्यावर पाटील आडनावाची बदनामी केल्याचाही आरोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलला प्रश्न विचारले असता त्यावर तिने प्रतिक्रिया दिली. गौतमी विरारमध्ये कार्यक्रमासाठी आली असताना माध्यमांशी बोलत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतमी पाटील म्हणाली, “मी राजकारणात येणार अशी चर्चा सुरू असली, तरी असलं काहीही नाही.”

मराठा महासंघाने गौतमीवर पाटील आडनावाची बदनामी केल्याचा आरोप केला. याबाबत विचारलं असता गौतमी पाटील म्हणाली, “मी आता या गोष्टींकडे लक्ष देणार नाही. मला कुणी काहीही बोलतं आहे. त्याने मला फरक पडत नाही. मी त्यावर बोलणार नाही.”

हेही वाचा : गौतमी पाटीलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, खरं काय? प्रश्न विचारताच म्हणाली, “माझं लग्न…”

गौतमीवर आरोप काय?

मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील व काही अन्य पदाधिकाऱ्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पाटील आडनाव लावण्याबाबत थेट इशारा दिला आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil comment on speculations of she joining politics surname controversy pbs