मुंबई : ‘न्यू इंडिया को-ऑप. बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या पॉलिग्राफी चाचणीत विशेष माहिती न मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय घेतला आहे. १२२ कोटींच्या अपहाराप्रकरणी मेहता मुख्य आरोपी असून तो चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे गुन्हे शाखेने त्याच्या पॉलिग्राफी चाचणीचा निर्णय घेतला होता. पण तो खोटी माहिती देत असल्याचे उघड झालेे.

कलिना येथील न्यायवैद्याक प्रयोगशाळेत लवकरच मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येईल. मेहताची ११ मार्चला सुमारे अडीच तास पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून आरोपीने चौकशीत खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलीस मेहताने दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत. मेहता याने इतर आरोपींसह कट रचून प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पण मेहता याबाबत कोणतेही सहकार्य करत नव्हता. अखेर याप्रकरणी मेहताची मंगळवारी पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली.

Story img Loader