आठ विभागांतील स्पर्धा केंद्रे जाहीर
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर
राज्यभरातील दोनशेहून अधिक महाविद्यालयांच्या एकांकिकांमधून आपल्या महाविद्यालयाची एकांकिका महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ ठरावी, यासाठी आता प्रत्येक महाविद्यालयात जोरदार तालमी सुरू झाल्या असतील.. नवनवीन संहिता लिहिणाऱ्या लेखकांच्या लेखणीतून दमदार एकांकिका कागदावर उतरल्या असतील.. कागदावरच्या शब्दांना मौखिक अभिनयाची जोड देऊन कलाकार ते नाटय़विभ्रम साकारतही असतील.. या सर्व वातावरणातच सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या आठही विभागांतील स्पर्धा केंद्रेही जाहीर झाली आहेत. त्यामुळे तरुणाईच्या या नाटय़विभ्रमांसाठी ‘लोकांकिका’चा रंगमंचही सज्ज झाला असून २९ सप्टेंबरपासून राज्यभरात ही नाटय़धुमाळी सुरू होणार आहे. आतापर्यंत अर्ज दाखल न केलेल्या महाविद्यालयांच्या माहितीसाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमुळे नाटय़वेडय़ा तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. ‘झी मराठी नक्षत्र’ हे टेलिव्हिजन पार्टनर लाभल्याने विविध टप्प्यांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा आस्वाद जगभरातील रसिकांना घेता येणार आहे. अस्तित्व या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ९३.५ रेड एफएम हे रेडिओ पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना हेरण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन्स हे टॅलेंट पार्टनर आहेत. यंदा स्टडी सर्कलही या स्पर्धेत नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत. यंदा अर्ज स्वीकृती सुरू झाली असून नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, रत्नागिरी, पुणे, ठाणे आणि मुंबई या आठ केंद्रांवर महाविद्यालये अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. अधिक माहिती indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2015 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्राथमिक फेरीचे वेळापत्रक व स्पर्धा केंद्रे
विभाग दिनांक केंद्र
औरंगाबाद २९,३० सप्टेंबर तपाडिया नाटय़ मंदिराचे क्रीडा सभागृह, निराळा बाजार, औरंगाबाद
रत्नागिरी २ ऑक्टोबर श्रीमान भागोजीशेठ कीर सभागृह, पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी
मुंबई ४ ऑक्टोबर पु. ल. देशपांडे कला अकादमी (रवींद्र नाटय़ मंदिर), तालीम हॉल, प्रभादेवी
नागपूर १, २ ऑक्टोबर हिंदू मुलींची शाळा, गांधी गेटजवळ, महाल, नागपूर
पुणे ४ ऑक्टोबर नूमवि कन्याशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, सदाशिव पेठ, पुणे
अहमदनगर २ ऑक्टोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, लोकमान्य टिळक मार्ग, अहमदनगर
नाशिक ४ ऑक्टोबर तालीम हॉल, महाकवी कालिदास कलामंदिर, कान्हेरे वाडी, नाशिक
ठाणे ३ ऑक्टोबर ज्ञानसाधना विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम शाळा, मनोरुग्णालयाजवळ, ठाणे