मराठी भाषा सर्वगुणसंपन्न असून तिच्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्व निकष आहेत. त्यामुळे येत्या २७ फेब्रुवारीच्या आत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ, असे आश्वासन सांस्कृतिक व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी ठाण्यात दिले.  ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात ते बोलत होते. जी भाषा प्राचीन आहे. १५०० ते २००० वर्षे जुनी आहे, तिला स्वत:चे मूळ वाड्:मय आहे आणि ती भाषांतरित नाही. अशा काही निकषावर अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. या सर्व निकषांमध्ये मराठी भाषा बसत असल्याने तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो, असेही विनोद तावडे यांनी सांगितले. मराठी माणसासाठी राजकारण आणि मराठी भाषेचे संवर्धन यामध्ये मोठी गल्लत झाली आहे. दुकानांच्या पाटय़ा मराठी हव्यात, पण मालक मराठी आहेत का, याचा विचार होत नाही.

Story img Loader