घाटकोपर पश्चिमेकडील असल्फा व्हीलेज येथे दुचाकी उभी करण्यावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी आणखी दोघांवर हल्ला केला असून त्यातील एकाच्या गळ्यावर वार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश शिंदे असे मृत तरूणाचे नाव आहे. मनजीत सिंह, विनोद सिंह व त्यांच्या साथीदारांनी शिंदेची हत्या केली. मनजीत व विनोद दोघेही सराईत आरोपी असून दोघांवरही २०१५ मध्ये हत्येचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय मनजीतवर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतही एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

असल्फा व्हिलेज येथील आंबेडकर नगर येथील महाराष्ट्र चाळ येथे हा प्रकार घडला. आरोपींनी प्रथम ओमकार पडवळ व गणेश शिंदे कोठे आहेत, असे तक्रारदार अमर कदमला विचारले. त्याने माहिती नसल्याचे सांगितल्यावर आरोपींपैकी एकाने कदमच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर गणेश याच्या छातीवर व पोटावर चार वार केले. आरोपींनी नागेश कोकाटे या तरूणालाही मारहाण केली. दुचाकी उभी करताना दुसऱ्या दुचाकीला घासली. ती दुचाकी आरोपींच्या गटातील एका तरूणाची होती. त्यावरून हा वाद झाला.

याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात अमर कदम यांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यापूर्वी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेशला शीव येथील पालिका रुग्णालयात दाखल केले. पण शिंदेचा मृत्यू झाला. आरोपींना अटक झाली नसल्याने मृताच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.