लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून घाटकोपर येथे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून फलकाखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता. ही शोध मोहीम गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. मात्र हे मदतकार्य गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले असून सध्या केवळ ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
घाटकोपरमधील महाकाय फलक सोमवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास पेट्रोल पंपावर कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, बीपीसीएल कर्मचारी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत मंगळवारी सकाळपर्यंत एकूण १४ जणांचा मृत्यू आणि ७८ जण जखमी झाले होते. शोध मोहिमेअंतर्गत बुधवारी आणखी दोघांचा मृतदेह सापडला. त्यामुळे मृतांची संख्या १६ वर पोहोचली.
आणखी वाचा-दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
फलकाचा मोठा भाग आद्यपही पेट्रोल पंपावर पडलेला आहे. त्यामुळे आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी सकाळपर्यंत मदतकार्य सुरू ठेवले होते. मात्र गुरुवारी सकाळपर्यंत कोणीही सापडले नाही. त्यामुळे सकाळी ९ च्या सुमारास हे मदतकार्य थांबवण्यात आले. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर मदतकार्य पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच दिवसभर ढिगारा हटविण्याचे काम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.