मुंबई : घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनाप्रकरणात २२ संशयित व्यवहारांच्या नोंदींबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे. त्यासाठी व्यावसायिक अर्षद खान याला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. या २२ व्यवहारांमधून ८० लाख रुपये देण्यात आले आहेत. त्याची तपासणी सध्या गुन्हे शाखा करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आरोपी भावेश भिंडे, मनोज संघू, जान्हवी मराठे-सोनलकर आणि सागर पाटील यांना अटक करत त्यांच्याविरोधात न्यायालयात तीन हजार २९९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा : मुंबई: आरपीएफच्या उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसह जखमी व्यक्ती, पालिका आणि मुंबई रेल्वे पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी अशा १०२ साक्षीदारांच्या जबाबांचा आरोपपत्रात समावेश आहे. या प्रकरणात ईडी पुन्हा अर्षद खानला चौकशीसाठी बोलवणार आहेत.