कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली. भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव आहे. त्यांचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी मुलाला फोन केला आणि सॉरी म्हटलं. त्यानंतर वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे मुंबईत हळहळ व्यक्त होते आहे. मागच्याच आठवड्या वडील आणि मुलाने भाईंदरमध्ये कर्जाचा बोजा वाढल्याने हातात हात घालून ट्रेनखाली येऊन जीव दिला. आता आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. मुलाला फोन करुन त्यांनी सी लिंकवरुन उडी मारली आणि आयुष्य संपवलं.

भावेश सेठ यांनी नैराश्यातून उचललं पाऊल

व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या भावेश सेठ यांनी नैराश्यातून हे पाऊल उचललं. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडे भावेश यांनी सी लिंक पर्यंत लिफ्ट मागितली. सी लिंकवर उतरल्यानंतर त्यांनी मुलगा स्मिथ शेठला फोन केला. त्याला सॉरी बेटा असं म्हणाले आणि आत्महत्या करत असल्याची कल्पना दिली. त्यानंतर सी लिंकवरुन स्वतःला समुद्रात झोकून दिलं आणि आत्मत्या केली. सी लिंकवरच्या पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळातच पोलीस मच्छिमारांसह भावेश सेठ यांच्या मदतीला धावले. त्यांना बाहेर काढण्यात आलं तसंच उपचारांसाठी भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारांच्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांना आत्महत्या केलेल्या जागेवर सुसाईड नोटही सापडली त्यामध्ये त्यांनी सॉरी बेटा, सर्व गोष्टींसाठी, कुटुंबाची काळजी घे असं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.

anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Success Story Of Chinu Kala
Success Story : मिसेस इंडिया स्पर्धेने बदललं आयुष्य! एकेकाळी विकले चाकू; वाचा अब्जावधीची कंपनी उभारणाऱ्या चिनू कालाची यशोगाथा
badlapur rape case marathi news
मैत्रिणीकडून गुंगीचे औषध, मित्रांकडून बलात्कार; बदलापुरातील खळबळजनक घटना, आरोपी अटकेत
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
Buldhana, Husband Sentenced 3 Years, wife Self Immolation, Alcoholic, Harassment, Domestic Violence, Court Verdict, Chikhli Taluka, Kinhola,
बुलढाणा: पत्नीला न वाचवता झोपी गेलेल्या पतीला तीन वर्षांची शिक्षा

हे पण वाचा- “तिला सहा लाख दिले, पण तरी त्रास…”, कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या; मरण्यापूर्वी केला VIDEO

bandra worli sea link marathi news,
वांद्रे वरळी सी लिंकवरुन उडी मारुन भावेश सेठ यांनी आत्महत्या केली. (Representational/Express Photo by Pradip Das)

भावेश सेठ कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश सेठ यांना कर्ज झालं होतं. या कर्जाच्या बोज्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. भावेश सेठ हे घाटकोपर येथील गरोडिया नगरमध्ये राहतात. त्यांनी एका टोयोटा कारची लिफ्ट घेतली. भावेश सेठ यांना लिफ्ट देणाऱ्या माणसाला मुळीच वाटलं नाही की भावेश सेठ असं काहीसं पाऊल उचलणार आहेत. त्याने भावेश सेठ यांना लिफ्ट दिली त्यानंतर भावेश सेठ हे सी लिंकजवळ उतरले. तिथून त्यांनी मुलाला व्हिडीओ कॉल केला. त्याला सॉरी म्हणत त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.